जळगाव (प्रतिनिधी) – आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कंपनीचे अधिकारी व सहकार्यांनी वृक्षारोपण केले. भाऊंच्या उद्यानात कंपनीच्यावतीने सुमारे ५०० हून अधिक रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन वृक्ष जगविण्याचे अभिवचन देखील दिले. व्यक्तीगत जीवनात देखील प्रत्येकाने वृक्ष जगविण्याचा संकल्प घेतला पाहिजे यादृष्टीने किमान एक वृक्ष तरी जगविण्यासाठी आपण स्वतः योगदान देऊन असा संकल्प जैन इरिगेशन कंपनीच्या अनेक सहकाऱ्यांनी केला.
जैन प्लास्टिक पार्क
जैन प्लास्टिक पार्क येथे ६ जून रोजी कंपनीच्या आवारात सहकाऱ्यांच्याहस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले. पहिला पाऊस पडल्यावर कंपनीच्या आवारातील मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण केले जाते त्यानुसार नजिकच्या काळात पुन्हा वृक्षोरोपण केले जाणार आहे, या कार्यक्रमास प्रामुख्याने डॉ. जन्मेजय नेमाडे यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. याशिवाय सी.एस. नाईक, आर.एस. पाटील, योगेश बाफना, जे.एस. जैन, आनंद बलोदी, संदीप नारखेडे, दिलीप वाघ, तुषार पाटील आदि सहकारी उपस्थित होते.
टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा
टिश्यूकल्चर पार्क इ ब्लॉकमध्ये ६ जून रोजी वृक्षारोपण केले गेले. यावेळी विजयसिंग पाटील, कल्याणी मोहरीर, सी.पी. चौधरी, मनोज पाटील आदि सहकारी उपस्थित होते.
जैन हिल्स व जैन फूड पार्क येथे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैन हिल्स येथे ५ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता अनिल जोशी यांच्यासह सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात गिरीश कुळकर्णी, अजय काळे, सुनील दांडगे, ज्ञानेश्वर सोन्ने, तुषार हरिमकर, ए.के. खान, हिमांशु पटेल आदी सहकारी उपस्थित होते. तर जैन एनर्जी पार्क व जैन फूड पार्क येथे देखील वृक्षारोपण झाले. जैन फूडपार्क येथे अविनाश नाईक, मंगेश देशमुख, सिक्युरिटी ऑफिसर स्वप्निल चौधरी, कैलास सैंदाणे, राजेश येवले, तुषार पाटील आदी सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.