जळगाव ( प्रतिनिधी ) – माझी वसुंधरा अभियानमधील जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी झाल्याने पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्याच्या वतीने सन्मान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी स्वीकारला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शेंदुर्णी नगरपंचायतीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत ६५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी डेक्सटॉप असेसमेंट मध्ये १५ ग्रामपंचायतीची फिल्ड असेसमेंट करिता निवड करण्यात आलेली होती पातोंडा व दहिवद ( ता.अमळनेर ) , मानमोडी ( ता. बोदवड ) , आडावद व चहार्डी ( ता. चोपडा ) , आसोदा ( ता. जळगाव ) , पहूर पेठ ( ता. जामनेर ) ,अंतुर्ली व सालबर्डी ( ता. मुक्ताईनगर) , पिंपळगाव बु ( ता. पाचोरा ) , चिनावल आटवाडे ( ता.रावेर ) , उंबरखेड ( ता.चाळीसगाव ) , न्हावी व मारुळ ( ता.यावल ) यां ग्रामपचायतींचा समावेश होता.