मुंबई ( प्रतिनिधी ) – उत्तराखंडमध्ये रविवारी स्टेअरींग लॉक झालेली बस दरीत कोसळली. या अपघातात २६ लोक ठार झाले आहेत आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.
रविवारी घडलेल्या या अपघातानंतर खळबळ उडाली होती. उत्तरकाशीच्या डामटा ते नौगांवदरम्यान, खड्ड जवळ बसचा अपघात झाला. तब्बल पाचशे मीटर खोल दरीमध्ये ही बस कोसळली. 30 प्रवासी या बसमध्ये होते. त्यातील 26 जणांचा मृत्यू झाला. तर इतर प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ही बस यमुनोत्रीकडे जात असताना हा अपघात झाला.
उत्तरकाशीमध्ये झालेल्या बसचा अपघात स्टेअरींग लॉक झाल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. भरधाव बसचं स्टेअरींग लॉक झालं. त्यामुळे चालकाला बस नियंत्रण करणं शक्य झालं नाही. अखेर ही बस थेट दरीत कोसळली.
या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही बातचीत केली होती. स्थानिक यंत्रणा आणि एसडीआरएफच्या टीमने तत्काळ बचावकार्य करत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हायड्रॉलिक फेल्युअर झाल्यानं कोणत्याही गाडीचं स्टेअरींग लॉक होऊ शकतं. गाडीच्या पुढील भागाची चाकं फिरली जावीत, यासाठी एक रॉड काम करतो. या रॉडच्या मदतीने स्टेअरींग जोडलेलं असत . स्टेअरींग रॅक आणि रॉड यांचं कार्य सुरळीत व्हावं म्हणून आईलही सतत काम करत असतं. ऑईल लिक झालं, तर रॅक फिरणं थांबतं आणि त्याचा परिणाम स्टेअरिंगवर होतो. आईल लिकमुळे आधी स्टेअरिंग हार्ड होतं आणि त्यानंतर ते लॉकही होण्याची शक्यता असते.
गाडीचा फुल टर्न मारुन ब्रेक मारल्यानंही गाडीचं स्टेअरींग लॉक होण्याची भीती असते. गाडीचा वेग, गाडीचं मोशन याचं संतुलन चुकलं तरिही गाडीचं स्टेअरींग लॉक होण्याची भीती असते. अनेकदा ड्रायव्हर वेगावरील संतुलन बिघडल्यानंतर जोराने स्टेअरींग वाकडं तिकडं फिरवतो. यामुळेही स्टेअरींग लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गाडी नियमित सर्विसिंग न करणं, तिची निगा न राखणं, ऑईल वेळच्या वेळी न बदलणं, ही कारणंही स्टेअरींग लॉकसाठी कारणीभूत ठरू शकतात. सस्पेशन, स्टेअरींग रॅक आणि रॉड यांचाही एकमेकांशी जवळचा संबंध असतो. यापैकी एकाही बाबीत बिघाड झाला, तर त्याचा थेट परिणाम स्टेअरींग लॉक सारख्या गोष्टीवर होऊ शकतं .