जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. केवळ आजच्या दिवशी पर्यावरणाबद्दल जागृकता न दाखवता वर्षभर यावर काम केलं पाहिजे. याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
े या निमीत्ताने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. नितीन भोळे (प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटीज), प्रा.ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), स्पर्धेचे पर्यवेक्षकप्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना जागतिक पर्यावरण दिना निमित्त महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे 2023 या वर्षा ची थीम बिट प्लास्टीक पोल्युशन इकोसिस्टम रिस्टोरेशन इशरीं श्रिरीींळल िेश्रर्श्रीींळेप, शलेीूीींशा ीशीीेींरींळेप याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे. गेली दोन वर्षे महामारीकाळात स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरणाचं महत्त्व कधी नव्हे इतकं लक्षात आलं आहे. जागतिक तापमान वाढ हा मानव जातीसमोरील सर्वाधिक मोठा धोका आहे. भारताने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरूवात देखील केली आहे. पर्यावरणात प्रदूषित घटकांची वाढ होत आहे, जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणूनच ज्या पृथ्वीशिवाय आणि पर्यावरणाशिवाय आपण जगू शकत नाही ते पर्यावरण निकोप राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, याबाबतची जागृती त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये केली.त्यानंतर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये प्रथम वर्षाच्या 50 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी त्यांचे सादरीकरण केले. या सादरीकरणांमध्ये मध्ये विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, वकृत्व,धाडस, नेतृत्व गुण, भाषेचे कौशल्य व विषयाचा अभ्यास या गुणवैशिष्ट्यांवर भर देण्यात आला.वकृत्व स्पर्धेत विजेते विद्यार्थी 1. दुर्गेश सोनार 2. प्राची गिरासे 3. अक्षदा भोळे 4. मयुरी भोई 5. कुणाल जाधव प्रदीप कोरी विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. ललिता पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व विभाग प्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली. त्यांना विभागाच्या इतर प्राध्यापकांनी मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या महाजन व देवेश नारखेडे व आभार प्रदर्शन साक्षी बारी या विद्यार्थ्यांनी केले.