जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथे 8 डिसेंबर रोजी कृषी कायदा मागे घेण्यासाठी शेतकरी यांना पाठिंबा देण्यासाठी भारत बंद पाठिंबासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीच्यावतीने आठ डिसेंबर रोजी पहूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

तरी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी बारा वाजेपर्यंत बंद ठेवावे असे आव्हान महा विकास आघाडीचे शहर प्रमुख सुकलाल बारी, माजी सरपंच प्रदीप लोढा, विभाग प्रमुख गणेश पांढरे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष शैलेश पाटील, उपसरपंच श्याम सावळे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अशिष माळी, ज्ञानेश्वर करवंदे, किरण पाटील, अजय जाधव, रमण शिरसागर, संजय तायडे आदींनी केले आहे.







