पाचोरा (प्रतिनिधी ) – श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे आज दि.६ डिसेंबर रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ए. बी. अहिरे यांनी सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच या प्रसंगी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन संजय वाघ, स्कूल कमिटी चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून श्री.गो.से हायस्कूल येथे सुरू असलेल्या सर्व सुधारणा कामांची पाहणी करून आढावा घेतला .याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ,पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, नरेंद्र पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








