माहेश्वरी सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव ( प्रतिनिधी ) – नांदेड येथील माहेश्वरी समाजाचे कार्यकर्ते व बिल्डर संजय बियाणी यांची काल भरदिवसा गोळीबार करून गुंडांनी हत्या केली. या हत्याकांडाचा निषेध करीत जिल्हा माहेश्वरी सभेने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली
संजय बियाणी यांनी 26 मार्चरोजी समाजातील गरजू लोकांसाठी 21 रो-हाऊसेस व 52 सदनिका अल्पदरात उपलब्ध करून दिल्या. त्यांना समाजातील तळागाळाच्या लोकांविषयी आस्था होती. त्यांच्या हातून अनेक समाजाभिमुख उपक्रम आजवर पार पडले. ते दानशूर होते. या घटनेचा जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून, संबंधित मारेकर्यांवर कडक कारवाई केली जावी.संजय बियाणी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आज करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
माहेश्वरी समाज पापभिरू आहे. या समाजातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकौंटंटस् इत्यादी आपापल्या व्यवसायातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात. या घटनेमुळे समस्त माहेश्वरी समाजाच्याच नव्हे, तर संपूर्ण व्यापारी जगताच्या मनावर आघात झाला आहे.
निवदेन देतेवेळी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे सभापती शामसुंदर सोनी, अध्यक्ष अॅड. नारायण लाठी, सचिव माणकचंद झवर, नगरसेवक नितीन लढ्ढा, राजेंद्र बिर्ला, कार्यालयीन मंत्री शिवनारायण तोष्णीवाल, सहकोषाध्यक्ष प्रवीण लढ्ढा, पीआरओ सागर मणियार, मनीष झंवर, तेजस देपुरा, सुनील झंवर, सुशील नवाल, लक्ष्मीकांत मणियार, दीपक लढ्ढा, चंदन तोष्णीवाल, बी.जे. लाठी , राधेश्याम बजाज, योगेश कलंत्री, नितीन कलंत्री, विराज काबरा, मुकेश बिर्ला, रूपेश काबरा, रोहन बाहेती, राहुल लाठी, शिरीष काबरा, अतुल सोमाणी, अरुण लाहोटी, प्रसाद नवाल, प्रवीण सोनी, प्रमोद हेडा, सुनील काबरा, सचिन मणियार, शंकर इंदाणी, संजय चितलांगे, राकेश लढ्ढा, अंजनीप्रसाद मुंदडा, अशोक जाजू, अशोक लाठी, भूषण मुंदडा, विशाल कापडिया, गिरीश झंवर, विनोद मुंदडा, श्रीकांत भुतडा, मुकेश बांगड, कैलास सोमाणी, मयूर जाखेटे, जगदीश जाखेटे, प्रितम लाठी, अॅड.प्रवीण झंवर, माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा, डॉ.महेंद्र काबरा, डॉ.चंद्रशेखर सिकची आदीं उपस्थित होते.