जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजप – काँग्रेस – प्रहार युतीचे सहकार पॅनल व संजय गरुड यांचे नेतृत्वातील राष्ट्रवादी – सेनेचे शेतकरी पॅनल आमने – सामने उभे ठाकले आहेत सहकार पॅनलच्या एस सी व ओबीसी मतदार संघातील २ जागा बिनविरोध जाहीर झाल्या आहेत .
मागील तीन पंचवार्षिक पासून बिनविरोध होत असलेली जामनेर विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक काही हट्टी लोकांमुळे होत असून 13 जागांपैकी अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील दोन जागा आमदार गिरीश महाजन यांच्या सहकार पॅनलच्या बिनविरोध झाल्या आहेत .
महिला प्रवर्ग तसेच भटक्या जाती जमाती प्रवर्गातील मतदारसंघात एकासएक लढत होणार असून सर्वसाधारण आठ जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत सहकार पॅनलने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत शेतकरी पॅनल आठपैकी सात उमेदवार देऊ शकले.
या निवडणूकीत आमदार गिरीश महाजन यांचेसोबत काँग्रेस, प्रहार जनशक्ति पक्ष यांची युती झाली आहे भाजप 8, काँग्रेस 4, प्रहार 1 असे जागावाटप झाले आहे आमदार गिरीश महाजन ,काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, माजी अध्यक्ष जगन लोखंडे, शहराध्यक्ष पारस ललवाणी, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदिप गायके यांचे नेतृत्व असलेल्या सहकार पॅनलसमोर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे संजय गरूड , सुधाकर सराफ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनल आहे .
भाजप, काँग्रेस, प्रहारचे उमेदवार असे आहेत – सर्वसाधारण गटात शंकर राजपूत, विजय सोनवणे, प्रदिप गायके, राजेंद्र भोईटे , ज्ञानेश्वर माळी , देवराम चौधरी, पांडुरंग महाजन, अ जावेद अ वाहेद, महीला प्रवर्ग – स्नेहकांता लोखंडे, माधुरी लखोटे, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – गोविंदा धनगर, अनुसूचित जाती प्रवर्ग – जगन्नाथ सुरडकर (बिनविरोध ) , इतर मागास प्रवर्ग – गोपाल पाटील.( बिनविरोध)
राष्ट्रवादी व शिवसेना युतीचे उमेदवार असे आहेत – सर्वसाधारण प्रवर्ग – रमेश पाटील , किंमत राजपूत, पांडुरंग सोनवणे, कविता बोरसे, प्रवीण महाजन , सुधाकर सोनार,प्रमोद टहाकळे , महिला प्रवर्ग – लिलाबाई महाजन , अत्तर बी उस्मान, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – सुनिल धनगर . सहकार पॅनलला कपबशी व शेतकरी पॅनलला छत्रि हे चिन्ह मिळाले आहे.