जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव – भुसावळ महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ भरधाव दुचाकी उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरेश्वर गोपाळ चौधरी (वय-५५) रा. भादली ता.जि.जळगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. “जळगाव तालुक्यातील भादली येथील रहीवासी हरेश्वर चौधरी हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहायला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका बॉयलर कंपनीत कामाला आहे. काल शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीएल २८९९) ने निघाले. जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या कंटेनर (एचआर ३८ ए ७२२२) ला जोरधार धडक दिली. या अपघातात हरेश्वर चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.