मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – प.पु.गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रमाव्दारे काल दुपारी ठिक 12:39 या शुभ मंगलमयी समयी श्री राम जन्मभूमि अयोध्या नगरीत प्रभु_श्रीरामचंद्र यांचे मंदिराचे भुमीपुजन निर्विघ्नपणे पार पडुन मंदिर निर्माण कार्याची यशस्वी सुरवात होवुन संपूर्ण जगाने मर्यादा पुरुषोत्तम यांचा आदर्श घेऊन रामराज्य निर्माण करावे. त्या निमित्ताने या क्षणी हभप रविंद्र हरणे महाराज, हभप उध्दव जुनारे महाराज, हभप रतीराम महाराज, हभप पंकज महाराज यांचे शुभ हस्ते प्रतिमा पुजन सामुहिक रामरक्षा स्त्रोत व आरती करण्यात येवुन रात्री 101 दिव्यांची आरास प्रज्वलित करण्यात आली. यावेळी गजानन पाटील, किशोर गावंडे बापु, डॉ प्रदिप पाटील, रघुनाथ पाटील, पुरुषोत्तम वंजारी, विशाल सापधरे, किरण महाजन, प्रमोद कोळी, साईराम ई. रामभक्तांची उपस्थिती होती.









