जळगाव ( प्रतिनिधी ) – बजरंग बोगद्याजवळ एका मुलीचा ५९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी १७ ऑक्टोबररोजी लांबविला होता. तीन संशयितांना अटक करण्यात आली रविवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीसांनी फिर्यादीस चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या हस्ते परत देण्यात आला.
पुजा दिलीप भावसार (वय-२८ , रा. गणेश कॉलनी अशोक बेकरी ख्वाजा मिया जवळ ) ही तरूणी १७ ऑक्टोबररेाजी दुपारी गणेश कॉलनीतील अशोक बेकरीजवळ पायी जात असतांना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके १३८६) क्रमांकावरील दुचाकीवरील अनोळखी तीन जणांनी धडक दिली. पुजा भावसार यांच्या हातातील ५९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल उचलून धमकी देवून दुचाकीवरून पसार झाले होते.
तरूणीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होत. तपास स फौ पुरूषोत्तम वाघळे करीत होते.तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. मोबाईल हस्तगत केला. रविवारी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जिल्हापेठचे पो नि रामदास वाकोडे यांच्या उपस्थितीत फिर्यादीस मोबाईल परत देण्यात आला.