जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या निवडणूकीत रस्त्यांचा मुद्दा पुढे करून निवडून आलेत. मात्र अद्यापपर्यंत शहरातील
विविध कामे झालेली नाही. कामे होत नसतील तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामे द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष
अभिषेक पाटील यांनी केले. शहरातील शिवाजी नगरात सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
विद्यमान आमदार आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी येत्या दहा दिवसात रस्त्यांवरील खडुयांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर
महापालिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टाळे लावण्यात येईल असा इशारा यावेळी अभिषेक पाटील यांनी सांगितले. यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.