पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील भाजपा महिला आघाडीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त “सन्मान स्त्री कलागुणांचा” ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाचोरा शहरातील महिलांसाठी आयोजित या स्पर्धेमध्ये विविध पाच स्पर्धा प्रकार आहेत. प्रथम पाच येणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे व स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे .
पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या पत्नी पुजा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे. “सन्मान स्त्री कलागुणांचा” या ऑनलाईन स्पर्धेत १८ वर्षावरील युवती व महिलेला प्रवेश निशुल्क असून प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास पैठणी, द्वितीय क्रमांकास सोन्याची नथ, तृतीय क्रमांकास डिनर सेट, चौथ्या क्रमांकास मेकअप किट व पाचव्या क्रमांकास बाउल सेट देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलेला भेटवस्तू मिळणार असल्याने या स्पर्धेत सहभागी स्पर्धक महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
उखाणा स्पर्धा ( स्पर्धक महिलेचा उखाणा घेतानाचा व्हिडिओ), रांगोळी स्पर्धा (स्पर्धक महिलेने स्वतः रेखाटलेल्या रांगोळी सोबतचा फोटो), मेहंदी स्पर्धा (स्पर्धक महिलेचा फोटो/ किंवा सेल्फी), सुंदर माझे देवघर स्पर्धा (घरातील सजवलेल्या देवघरा सोबतचा स्पर्धक महिलेचा फोटो), हस्तकला स्पर्धा (स्पर्धेत महिलेने स्वतः बनवलेले शो पीस, वॉल पीस, पेंटिंग, भरतकाम, विणकाम वगैरे सोबतचा फोटो) .
व्हिडिओ व इतर सर्व स्पर्धांचे फोटो आयोजकांकडे व्हाट्सअप द्वारे पाठवायचे आहेत. स्पर्धेचे फोटो/व्हिडिओ ११ मार्च पर्यंत खालील नंबरवर व्हाट्सअप करावयाचे आहे. उखाणा स्पर्धा- ८०८०९८९०४६ , रांगोळी स्पर्धा- ८०८०९५७१८४ , मेहंदी स्पर्धा- ९३५९४३१६७९ , सुंदर माझे देवघर स्पर्धा- ९३५९००९५९० , हस्तकौशल्य वस्तू स्पर्धा- ८४५९५५५४१०