जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या वाढदिसानिमित्त सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .
जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या वाढदिसानिमित्त कृष्णा क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) डॉ अमोल भोसले (एम.बी.बी.एस.) , डॉ.दिपाली माने यांच्या उपस्थितीत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये इ.सी.जी,
शुगर, आणि बी.पी.तपासणी मोफत आणि बाकीचे उपचार अल्प दरात देण्यात आले.या वेळी 400 रुग्णांनी तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला.यासाठी कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.