पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा माहेर व चाळीसगाव सासर असलेल्या विवाहितेच्या पतीच्या नोकरीसाठी माहेरुन तीन लाख रुपयांची मागणी केली होती ती पूर्ण न केल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करत मारहाण केली म्हणून अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शारदा गणेश राखुंडे ( रा दिल्ली दरवाजाजवळ पारोळा ) हिचा चाळीसगाव येथील राखुडे कुटुंबात विवाह झाला विवाहानंतर काही दिवसांनी तिच्या पतीला नोकरी लावण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली होती परंतु माहेरची परिस्थिती नसल्याने ती मागणी पूर्ण करू न शकल्याने सासरची मंडळी गणेश राखुंडे, नाना राखुंडे, मिनाबाई राखुंडे, गुड्डी उकाळे, सोनी उपाध्ये, हेमंत पाथरे, एकनाथ राखुंडे, निर्मला राखुंडे, सुनील राखुंडे, कैलास राखुंडे, सुभाष राखुंडे ( सर्व रा – चाळीसगाव ) यांनी वेळोवेळी विवाहितेस शिवीगाळ , मारहाण करून छळ केला म्हणून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो हे कॉ जयवंत पाटील करत आहेत.