तोंडापूर, ता. जामनेर ( प्रतिनिधी ) – दि कुंभारी बु येथील कुशल गणेश जोशी व जीवन अशोक जोशी या दोन्ही एकाच कुटूंबातील सख्या चुलत भावाची ईंडीयन नेव्हित नुकतीच निवड झाली आहे ओडिसा राज्यातील आय एन एस चिलखा येथील प्रशिक्षण केंद्रात चाचणीत दोन्ही भाऊ एकाच ठिकाणी निवड होवून प्रशिक्षण साठी निवड झाली आहे तिन महिन्यासाठी ते प्रशिक्षण घेण्यासाठी हजर झाले आहे कुंभारी बु येथील छोट्या गावात राहत असून जोशी घराण्यातील चार पिढीतील पहिला शासकीय नोकरीला लागल्याने कुटूंबात आनंद व्यक्त होत आहे अत्यंत गरीब परिस्थिती मधून चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश सपांदन केले तोंडापूर माध्यमिक विध्यालयात दहावी च्या परीक्षेत फत्तेपूर सेंटर मध्ये जीवन जोशी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्राप्त केला तर कुशल जोशी हा तिसऱ्या क्रमाकाने पास झाला होता तर एकाच कुटूंबातील दोन्ही भाऊ याच्या निवडी बद्दल ग्रामस्थ व मित्र मंडळ समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन होत आहे व गावकऱ्यांन मध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे तोंडापूर येथील सामाजिक कार्यक्रर्त जितेंद्र पाटील व बंडू कलाल या मित्र परिवाराकडुन अभिनंदन करण्यात आले आहे.