जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ दुचाकीवरून १५ लाख रूपयांची कॅश घेऊन जाणार्या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड घेऊन फरार होणाऱ्या दोघांसह त्यांना आश्रय देणाऱ्या एकाला अशा तिघांना उल्हासनगरातून एमआयडीसी पोलीसांनी आज अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून साडेनऊ लाख रूपये हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगावात आणण्यात येत आहे. मनोज खुशाल मोकळ, विक्की उर्फ रितीक राणा (दोन्ही रा.धुळे) व दीपक सोनार (रा.उल्हासनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे की, एमआयडीसीतील प्रभा पॉलीमर कंपनीचे कर्मचारी महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय-५१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे १ मार्च २०२१ रोजी दुपारी ५ वाजेता आर. कांतीलाल जोशी पेठे मटन मार्केटजवळ येथून ५ वाजेच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊनच्या गणपती नगर कडे जाण्यासाठी निघाले. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड कापडाच्या पिशवीत ठेवून एका दुचाकीवर होते. तर विभांडीक हे त्यांच्या सोबत दुसर्या दुचाकीवरून जात होते. हे दोन्ही जण पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असतांना अज्ञात दोघांनी विनानंबरच्या दुचाकीने ओव्हरटेक केला. भावसार यांच्या गाडीला पिशवीसह रोकड लांबविला होता. याप्रकरात झालेल्या झटापटीत भावसार यांची दुचाकी घसरल्याने तेही पडले. त्याने दोन्ही चोरट्यांची गाडी देखील स्लिप झाली. यातील एकाने महेश भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. यामुळे चोरट्याने रिव्हॉल्व्हर काढून त्यांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. भावसार यांच्या हातातील १५ लाख रूपयांची बॅग घेवून चोरट्यांनी दुचाकी जागेवर सोडून एकाच दिशेने पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.







