जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली प्र.बो. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज सर्व म्हणजे तेरा जागा जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलला मिळाल्या सभासद मतदारांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळवत हे यश मिळाले.
शिरसोली प्र.बो.विकासो टोटल एकुण मतदान 1202 पैकी 845 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणूकीत 3 पॅनल आमोरा – समोर निवडणूक लढवित होते.या निवडणुकीत जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलनला तेराच्या तेरा जागेवर घवघवीत यश मिळविले. संस्थेच्या व्यापक हितासाठी धडपड , जिल्हा बँकेसह ,कृषी उत्पन्न बाजार समिती संबंधित सरकारी विभागांसोबत समन्वयाने कामाची हमी , सभासद शेतकऱ्यांची कामे विनासायास व्हावीत म्हणून दक्षतेने करावयाचे उपाय , वसुली आणि कामातील समस्यांच्या सोडवणुकीच्या प्रयत्नांमध्ये सातत्य हे मुद्दे सभासद शेतकरी मतदारासमोर मांडले होते म्हणून यात सर्व जागेवर यश मिळवून विजय मिळवला आहे.
जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलचे
विजयी उमेदवारांना मिळालेली मते
कर्जदार खातेदार सर्वसाधारण मतदारसंघातून गोकुळ बारी (365 ) राजू लोटू बारी (397 ) विजय निळकंठ बारी(420) सुभाष बारी (393 ) विजय रुपला बारी ( 422 ) समाधान चिंधू बोबडे (386 ) ज्ञानेश्वर माळी (390 ) बाळू तुळशीराम पाटील (366) महिला राखीव मतदारसंघातून सुरेखा रामकृष्ण बारी (402), सकुबाई मिठाराम पाटील (404) इतर मागासवर्गीय मतदारसंघात उत्तम रघुनाथ बारी (408) भटके विमुक्त जाती – जमाती मतदारसंघात शेनफडू पाटील (412) अनुसूचित जाती – जमाती मतदारसंघात रामकृष्ण दगडू नेटके(423) हे उमेदवार विजयी झाले तर निवडणूक प्रक्रिया साठी निवडणूक निर्णय अधिकारी – दिपक पाटील , विकासो सचिव – भालचंद्र वाणी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला
निवडणूकीत मतदान झालेले बाद
अनुसूचित जाती मध्ये बाद 75
विमक्ती भटक्या जाती बाद 71
इतर मागासवर्गीय बाद 68
महिला राखीव बाद 57
जनरल मतदारसंघात 61