जळगाव ( प्रतिनिधी ) – तायक्वांडो असोसिएशन ऑफ वर्धा, व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वी राज्यस्तरीय कॅडेट क्युरोगी तायक्वांडो स्पर्धेचे दिनांक १२ ते १४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आज जिल्हा पेठ व्यायाम शाळा, जळगांव येथे निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीमध्ये जळगाव, जामनेर, चाळीसगाव, रावेर येथील खेळाडूंनी सहभाग घेतला.
यातील सुवर्ण पदक विजेते पुढीलप्रमाणे
मुले : ३३ किलो आतील ओम गोंधळी शेंदुर्णी, ३७ किलो आतील मुकेश भोई, शेंदुर्णी, ४१ किलो आतील भावेश चौधरी, शेंदुर्णी, ४५ किलो आतील साई निळे, रावेर, ४९ किलो आतील अनिरुद्ध महाजन, जळगाव, ५७ किलो आतील अर्नव जैन, जळगाव, ६५ किलो वरील कार्तिक बेलदार, चाळीसगाव.
मुली : ३७ किलो देवयानी पाटील, जळगांव, ४१ किलोआतील परमश्री सोनार, रावेर, ४४ किलो आतील सिमरन बोरसे, जळगाव, ४७ किलो आतील चैताली महाजन, रावेर, ५१ किलो आतील निकीता पवार, जळगांव या खेळाडूंची निवड झाली आहे तर संघ प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जळगाव, जयेश कासार रावेर तर संघ व्यवस्थापक म्हणून शुभम शेट्ये चाळीसगाव यांची निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून पुष्पक महाजन, यश शिंदे, जयेश बाविस्कर, अजित घारगे यांनी काम पाहिले. राज्यस्पर्धेत निवड झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सदस्य कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन, सौरभ चौबे, महेश घारगे तसेच जैन स्पोर्टस् अॅकॅडमी चे अरविंद देशपांडे, रावेरचे सचिव जिवन महाजन, शेंदुर्णीचे श्रीकृष्ण देवतवाल यांनी कौतुक केले आहे.