जळगाव (प्रतिनिधी ) – पवित्र कुराण मध्ये पारा क्र. 21 (श्लोक) मध्ये अल्लाह तआला म्हणतो की, नमाज हे वाईट गोष्टी व वाईट कार्यापासून थांबविते, तसेच इस्लाम धर्मात स्वतःच्या पत्नीशिवाय दुसऱ्या पर स्त्री बरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करणे तर दूरच, तिच्यावर वाईट नजर टाकणे ही जिना (महापाप) आहे. जो कोणी बलात्कार करेल त्याला लवकरात लवकर मृत्युदंड देण्याची तरतूद चौदाशे वर्षांपूर्वीच शरिअत ( इस्लामी कायदा) मध्ये आहे. दुसऱ्या देशांच्या तुलनेत ज्या देशात शरिआ कायदा लागू आहे तिथे एकही महिलेवर बलात्कार किंवा महिलां बरोबर छेडखानी, अत्याचार होत नाही.
असे असताना सुद्धा योग गुरु रामदेव बाबा यांनी एका सभेत” मुस्लिम धर्मियांचा एकच कार्यक्रम आहे की, पाच वेळा नमाज पठण करा आणि…… ” असे वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्य करून एका धर्माच्या मुलींच्या उल्लेख करून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असून बाबांचा त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठन व इस्लाम बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामदेव बाबांचे निषेध करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत तसेच काही लोक एक दुसऱ्यांच्या धर्म तसेच महापुरुष व देवी देवतांबाबत करत असलेल्या चुकीच्या व आक्षेपार्ह वक्तव्य रोखण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा यासाठी महामहीम राष्ट्रपती साहेबा, भारत सरकार, नवी दिल्ली यांना मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्याद्वारे निवेदन पाठवून मागणी केलेली आहे. याप्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सै. जावेद अमीर, हाजी शेख सलीम उद्दीन, उमर सय्यद रोशन, शफी ठेकेदार, फिरोज प्लंबर, शेख नूर मोहम्मद, कामील खान, जमील शेख, अफसर शहा, मुस्ताक नसीर इत्यादी उपस्थित होते.
फोटो :- मा. जिल्हाधिकारी सो. यांना निवेदन सादर करताना सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, फिरोज प्लंबर.