मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवार ४ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील उचंदा येथील १६ वषीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने शुक्रवार ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर शेजोळे करीत आहे.







