अमळनेर येथे मध्यरात्रीची घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरातील पाचकंदील भागातील किराणा दुकान फोडून रोकड आणि किरणा सामानाची चोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी उघकीला आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील पाचकंदील भागात किशोर नारायणदास हिंदूजा (वय-३४) रा. सिंधी कॉलनी यांचे किशोर टेंडिंग नावाचे किराणाचे दुकान आहे. ३ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानातील ७०० रूपये रोकड आणि २० हजार ४०० रूपये किंमतीचा किराणा दुकानातील माल शुक्रवारी दि. ४ डिसेंबर रोजी चोरून नेला. किशोर हिंदूजा यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.







