एरंडोल (प्रतिनिधी) – येथील कागदी पुरा भागातील रहिवाशी अब्दुल रहमान व त्याच्या सोबत असलेला एक शकील शेख मुस्ताक या दोघा तरुणांचा दौलतपुरा बंधाऱ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रईस अहमद रफीओउद्दीन वय 38 वर्ष, शेख शकील शेख मुस्ताक वय 35 वर्ष, अब्दुल रहमान नदीम अहमद वय 15 वर्ष सर्व राहणार कागदी पुरा एरंडोल हे नागदुली शिवारातील दौलतपुरा बंधारा या ठिकाणी सायंकाळी फिरायला गेले असता अब्दुल रहमान हा पाय धुण्यासाठी गेला पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो घसरून पाण्यात पडला त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शेख शकील हा सुद्धा पाण्यात बुडाला एकाच वेळी दोन्ही युवक पाण्यात बुडून मरण पावले.
या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्परतेने पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले स्थानिक पट्टीचे पोहणारे व इतर लोकांच्या मदतीने बुडायला युवकांचा शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली मात्र अंधार पडल्यामुळे व तशातच पाऊस सुरू असल्याने शोधकार्य तुर्तास थांबविण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरा मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मन्याड धरण 100% भरल्यामुळे 900 क्युसेस प्रवाह गिरणा नदीला मिळतो मन्याड धरणापासून दहिगाव चे अंतर शंभर किलोमीटर आहे त्यात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे जवळपास दोन हजार क्युसेस प्रवाह दहिगाव बंदरापासून वाहत आहे.एरंडोल येथील हे तरुण मासे पकडायला गेले होते की पोहायला गेले होते की फिरायला गेले होते याबाबत जनतेमधून चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान गिरणा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांच्याशी संपर्क केला असता गिरणा कालव्याचा प्रवाह थांबवण्यात आला







