पशुरोग निदान शिबीरामध्ये पशुपालकांनी नोंदवला उस्फूर्त प्रतिसाद
या शिबिरात बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यातून एकूण ४८७ जनावरांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात मोठे पशू शस्त्रक्रियेसाठी आले होते. यासोबतच गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण तसेच लहान श्वानावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरात एकूण ३७ प्राण्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरात बैल, घोडे अशा मोठ्या प्राण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
जळगावातील पशु संवर्धन विभागाकडून वेगवेगळ्या विभागासाठी दहा तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या. सर्व डॉक्टरांच्या टिमने मेहनत घेत शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे विविध योजनांचे स्टॉल लावत पशु पालकांना माहिती देण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्या नेतृत्वात संपुर्ण टिम शिबिर यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी पशुसंवर्धन विभागाचे कौतुक केले.