सोयगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात सततचा पडलेला पाउस आणि ढगाळ वातावरणाने पिकांची झालेली बिकट स्थिती पाहून घोसला ता.सोयगाव येथील शेतकर्याने धसका घेतल्याने शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला.
शरीफ शामत तडवी असे आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकर्याचे नाव आहे.घोसला शिवारात त्याची तीन एकर शेती आहे.मंगळवारी पावसाच्या उघडीप मिळताच त्याने शेतावर फेरफटका मारला.परतू सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणाने पिकांची झालेली चिंताजनक स्थिती त्यामुळे त्याने धसका घेतल्याने शेतातच त्या कर्जबाजारी शेतकर्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत आत्महत्या केली आहे.या शेतकर्याने खासगी कर्ज काढून खरीपाची पेरणी केली होती.परंतु या अल्पभूधारक शेतकर्याच्या कपाशी पिकांचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते आणि कर्जाचा डोंगर हलका करण्याच्या विवंचनेत त्याने शेतातच विषारी औषध प्राशन केले.त्याला तातडीने उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतूची नोंद करण्यात आली आहे.








