सोयगाव (प्रतिनिधी) – औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी सोयगाव तालुक्याच्या दौर्यावर येणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या सर्वच यंत्रणांना मिळाली होती. त्यामुळे नागरिकांची गुरुवारची पहाट थेट गावपातळीवरील कर्मचार्यांच्या उपस्थितीने झाली कर्मचारी उपस्थित का असा शोध ग्रामीण भागात नागरिकांनी घेतला असता,कन्नड मार्गे जिल्हाधिकारी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर थेट शेताच्या रस्त्यावर शेतकर्यांनी डोळा ठेवत जिल्हाधिकार्यांची प्रतीक्षा केली परंतु अखेरीस सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करूनही भ्रमनिरास झाल्याने शेतकर्यांच्या सर्वच अपेक्षा धुळीस मिळाल्या होत्या.

जिल्हाधिकारी औरंगाबाद गुरुवारी सोयगाव दौर्यावर येणार होते. कन्नडमार्गे जिल्हाधिकार्यांचा दौराही निश्चित झाला परंतु अखेरीस जिल्हाधिकार्यांचा दौरा रद्द झाल्याने शेतकर्यांची एक नजर शेतीकामांवर आणि दुसरी नजर रस्त्यावर अशी होती. शेतकर्यांची प्रतीक्षा करण्याचा उद्देश एकच होता सततच्या पावसाच्या नुकसानीत बाधित झालेल्या पिकांची पंचनामे व जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी परंतु जिल्हाधीकारिच न आल्याने भ्रमनिरास झाला आहे.
सोयगाव तालुक्याचा दुसर्यांदा दौरा रद्द
जिल्हाधिकारी यांनी सोयगाव तालुक्याचा दुसर्यांदा दौरा लावला होता.परंतु अचानक वाढत्या कारणांमुळे दोनदाही दौरा रद्द करण्यात आला.त्यामुळे आता जिल्हाधिकारी केव्हा येणार याचा उलगडा मात्र झालेला नाही.
कन्नडमार्गे जिल्हाधिकारी मोटारीने सोयगाव दौर्यावर येणार असल्याचा दौरा अंतिम करण्यात आला होता.प्रारंभी जरंडी कोविड केंद्रात भेट त्यानंतर पिककापणी प्रयोगाची सुरुवात त्यानंतर सोयगाव
त्यानंतर पिककापणी प्रयोगाची सुरुवात त्यानंतर सोयगावला कोरोना उपाय योजनांचा आढावा याप्रमाणे तालुका प्रशासनाचे नियोजन होते,त्यासाठी प्रशासनाच्या सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या होत्या,गावागावात कधीही न येणारे कर्मचारी पहाटेच गावपातळीवर हजर झाले होते,त्यामुळेच शेतकर्यांना जिल्हाधिकारी यांच्या दौर्याची कुणकुण लागली होती.







