पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सामनेर येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा लोक सहभागातून जीर्णोद्धार करून मंदिरातील विठ्ठल- रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई व श्री गणेश मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा उद्या करण्यात येत आहे.
यासाठीचे विधिवत धार्मिक आजपासून सुरू झाले आहेत 3 एप्रिलरोजी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली 4 एप्रिलला यजमानांना दसवीधा स्थान, प्रायश्चित्त संकल्प, मंडप प्रवेश, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नंदी श्राद्ध कर्म, वास्तु मंडळ , योगिनी मंडळ, क्षेत्रपाल मंडळ, सर्वतो भद्र मंडळ स्थापना, देवाला जलधीवास हे कार्यक्रम पार पडत आहेत 5 एप्रिलरोजी स्थापित देवता प्राप्त पूजन, देवाला दशाविध स्थान आणि 81 कलशद्वारे औषधी स्नान, नवग्रह हवन , मुख्य देवता हवन , शांती हवन आणि देवाला धान्य अधिवास , 6 एप्रिलला देवाला निद्रेतून प्रबोधन, स्थापित देवता वन बलीदान , पूर्णाहुती , देवाची मुख्य प्राणप्रतिष्ठा व संतांची प्राणप्रतिष्ठा , महापूजा , कलशारोहण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
हा प्राणप्रतिष्ठा सोहळा रामआश्रम नांद्राचे मठाधिपती श्री श्री 1008 डॉ विष्णूदास महाराज, स्वामी महाराज यांच्या हस्ते व प्रवचन होणार आहे प्राणप्रतिष्ठेचे मुख्य आचार्य वेदमूर्ती देवेंद्र साखरे तर सलग रोज रात्री भागवत कथाकार ह भ प बापू महाराज देशमुख जानोरीकर (शेगाव) हे भागवत कथा वाचन करणार आहेत . परिसरातील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सामनेर यांच्याकडून करण्यात आले आहे.