उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी नवा दिलासा
जळगाव ( प्रतिनिधी ) – उत्तर महाराष्ट्रातील मधुमेह रुग्णांसाठी नवा दिलासा देणारी बाह्यरुग्ण तपासणीची सेवा आता जळगावातील अरूश्री हॉस्पिटलमध्ये सुरु झाली आहे .
अरूश्री हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता या हॉस्पिटलमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी आणि उपचार सकाळी ११ ते दुपारी ४ आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंतच्या वेळेत मधुमेहतज्ज्ञ डॉ.स्वाती बाविस्कर यांच्याकडून केली जाणार आहे . डॉ.स्वाती बाविस्कर यांची ओळख या आजारावरील देवदूत अशी आहे , असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही . त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि अरूश्री हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार सुविधांचा मोठा फायदा आता उत्तर महाराष्ट्रातील मधुमेह रुग्णांना होणार आहे .
रुग्णांच्या माहितीसाठी अरूश्री हॉस्पिटल , क्रिटिकल ट्रॉमा केअर सेंटर , १९ , महेश प्रगती मंडळ हॉलजवळ , महेश मार्ग , रिंग रोड , जळगाव असा या रुग्णालयाचा पत्ता असून संपर्कासाठी ०२५७ – २२३२३६९ असा दूरध्वनी क्रमांक आहे .