जळगाव ( प्रतिनिधी ) – महाबळ परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद दत्तू खरोटे (वय-४२) हे हरीओम नगर असोदा रोड जळगाव येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत . ते महाबळ परिसरात नोकरीला आहेत . २ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकी (एमएच १९ एडी ६९८५) ने महाबळ परिसरात कामाला गेले. महाबळ येथील विद्यूत नगरी येथे त्यांनी त्यांची दुचाकी लावली होती. रात्री ८ वाजता काम आटोपून ते दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू कोठेही आढळून आली नाही. ३ मार्च रोजी दुपारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहेत