जळगाव ( प्रतिनिधी ) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना इच्छादेवी चौकात घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल सुधाकर बागुल (वय-३५, रा. हनुमान नगर मेहरूण) हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. बुधवारी दुपारी इच्छादेवी चौकात सलीम ऊर्फ भाल्या तडवी ( रा. तांबापुरा) त्याच्याजवळ आला. आणि कुणालकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. कुणालने दारूसाठी पैसे दिले नाही, याचा राग आल्याने सलीम तडवी याने हातातील काठी ठोक्याला मारली. कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. संशयीत आरोपी सलीम ऊर्फ भाल्या तडवी रा. तांबापुरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार करीत आहेत