जळगाव ( प्रतिनिधी ) – हॉटेलमधील सीसीटीव्हीही फुटेज तपासण्याच्या वादात हॉटेल मालकाच्या मेहुण्याला मारहाण करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादी महेश रडे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे सर्वोदय पेट्रोलपंपच्या बाजुला प्रभात रेस्टॉरंट आणी भरित सेंटर हे हॉटेल असुन त्या हॉटेलवर मी व माझे पाहूणे हेमंत पाटील ( रा.गुरुकुल सोसायटी ) बसतात. काल सायंकाळी मी माझ्या बर्फाांच्या फॅक्टरीत होतो, तेव्हा माझ्या हॉटेलमधिल वेटर हर्षद पटेल माझ्याकडे आला व त्याने सांगीतले की, हॉटेलमध्ये 4 इसम आले असुन त्यांना हॉटेलचे सीसीटीव्हीही फुटेज तपासायचे आहे मी हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा मला धुडकु सपकाळे व त्याचे सोबत 3 इसम फुटेज बघत होते मी माझ्या हॉटेलमधील माणसांना सांगीतले की, तुम्ही यांना फुटेज का चेक करु दिले, याचा राग धुडकु सपकाळे याला आल्याने त्याने मला शिवीगाळ केली व तु हॉटेल कशी चालवतो व तुझी हॉटेलची तोडफोड करु अशी धमकी देऊन ते निघुन गेले बाहेरून फोन करून त्यांनी दुसरे लोक बोलविले त्यानंतर माझे पाहूणे देखील हॉटेलमध्ये आले दोन अनोळखी इसमांनी हॉटेलमधील कामगारांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण केली मी व माझे पाहणे सोडवासोडव करीत असतांना त्यामधिल एकाने हेमंत पाटील यांना डोक्यात लाकडी दांडका भारून दुखापत केली. मला धडक सपकाळे हा शिवीगाळ करीत होता आम्हाला मारहाण करून धुडकू सपकाळे व दोन अनोळखी इसम निघन गेले माझ्या पाहूण्यास डोक्याला मार लागल्याने रक्त निघत असल्याने त्यांना आम्ही डॉ. अनिल खडके यांचे दवाखान्यात नेले आहे.