जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर पेठ गावात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण गाव सर समितीची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महासंचालक दिनकर टेमकर यांच्या आदेशान्वये एक मार्च ते दहा मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केले जात आहे. सदर उपक्रम राबवण्यासाठी गाव स्तर समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत लोकनियुक्त सरपंच नीता ताई पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या गठीत समितीमध्ये पुढील कारणे करण्याची भैया मोरे, तलाठी सुनील राठोड, ग्रामसेवक दत्तात्रय टेमकर, आरोग्य सेवक रोहित पाटील, अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण, आशा वर्कर सुलचना बारी, शिक्षक तज्ञ म्हणून गणेश पांढरे, शिक्षक मिलिंद तायडे, मुख्याध्यापिका सुनंदा साळुंखे आदींची निवड करण्यात आली आहे. पहुर पेठ गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे.