नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाची पहिली लाट गेल्यानंतर दुसऱ्या लाटेसाठी भारत तयार नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातलं. त्यामध्ये ऑक्सिजन तुटवडा भासला त्यामुळे अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र भारतात कोरोनाची दुसरी लाट इतक्या वेगाने कशीकाय पसरली?, यावर जागतिक आरोग्य संघटनेने यामागचं कारण दिलं आहे.
भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे. त्यासोबतच इतर देशांमध्ये आढळलेल्या व्हेरियंटलाही नाव देण्यात आली आहेत. यातील डेल्टा या स्ट्रेनच्या एक विषाणूचं स्वरूप दुसऱ्या स्ट्रेनपेक्षा घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
भारतात विषाणूची दुसरी लाटे जास्त वेगाने पसरण्यामागे डेल्टा वेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के ज्यास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होतं. हे विषाणू स्वरुप तीन म्यूटेंट वेरिएंट आहे. कारण या स्वरुपातून विषाणू तीन लिनिएजमध्ये पसरला जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार सांगितलं आहे.
दरम्यान, या वेरियंटला नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. मे महिन्यात सुरूवातीला सापडलेल्या या स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी केंद्र सरकारने जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या B.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याच्या बातम्यांवर आक्षेप घातला होता.