जळगाव ( प्रतिनिधी ) – एकमेकांकडे पाहण्याच्या व खुन्नस देण्याच्या वादात एका तरुणाला तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने जखमी केले या तीन जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला
आसोदा गावातील कोळीवाडा येथे तोशल अर्जुन कोळी ( वय १८ ) राहतो. तोशल रविवारी दुपारी बहिणाबाई उद्यान येथे फिरत असतांना त्याने समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक जण यांच्याकडे बघितले. आमच्याकडे का पाहिले, या कारणावरुनया तिघांनी शिवीगाळ करत तोशल यास मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेकने तोशील याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. एकाने तोशलला पकडून ठेवत समाधान हाडे याने लाकडी काठीने डोक्यावर तसेच उजव्या हातावर मारहाण केली.तोशल जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक अनोळखी तरुण अशा तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला पुढील तपास पो हे कॉ विलास शिंदे करीत आहेत.