जळगाव ( प्रतिनिधी ) – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंगवून महिलेची सोन्याची चेन ओरबाडून नेणाऱ्या मोटारसायकलवरील दोन अज्ञातांविरोधात रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला
शालिनी दिगंबर पाटील ( रा. जीवन नगर ) या गृहिणी 3 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता घराजवळ असतांना मोटारसायकलवरून आलेले दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत मोटार सायकलवर मागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. नंतर मोटार सायकलने दोघांनी पलायन केले. चेन हिसकावणा-याच्या बोटाचे नख शालिनी पाटील यांना लागल्याने त्यांना गळ्याजवळ जखम झाली. रामानंद नगर पोलिस स्टेशनला दोघा अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.