शिमला ( वृत्तसंस्था ) – कुल्लू जिल्ह्यात शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १६ जण ठार झाले या अपघातातही मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली. यात १६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश होता . सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे.
या भीषण अपघातात अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असून यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. जखमींमध्ये बसच्या चालकासह प्रवाशांचा समावेश आहे. शाळकरी मुलं शाळेतून घरी परत जात होती, त्यावेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.