जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ अडीच वर्ष पूर्ण झाल्याने उपनगराध्यक्ष अनिस शेख यांनी राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी आज प्रा.शरद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी पिठासिन अध्यक्ष जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. यावेळी नगरपरिषदेची मुख्य अधिकारी राहुल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन, नगरपरिषद गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, बाबुराव आण्णा हिवराळे, आतिश झाल्टे, प्रविण नरवाडे, बंटी वाघ, नाजीम पार्टी, उल्हास पाटील, संध्याताई पाटील, ज्योतीताई पाटील, किरणताई पोळ आदी सर्व नगरसेवक तसेच नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रा. शरद पाटील यांचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.







