चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील लोंढेगाव येथे लग्नासाठी आलेल्या नातेवाईकाची ७१ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना घडली. मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोंढेगाव येथे गयाबाई डिंगबर पगारे यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांचे नातेवाईक अनिता बाविस्कर (वय – ४५, रा. मळाने पोस्ट वणी बु ता. जि.धुळे) हे लग्नासाठी आले आहे. सकाळी गयाबाई पगारे यांच्या घरातून अनिता बाविस्कर यांच्या बॅगमधून ७१ हजार रूपये किंमतीची सोन्याची २१ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. मेहुणबारे पोलीस ठाण्यात अनिता बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. अनवर तडवी करीत आहे.







