फैजपूर (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १ जानेवारी रात्री ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मुलीच्या नातेवाईकाने तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कुठेही मिळून आल्याने अखेर फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रभाकर चौधरी करत आहे.