जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचे कारणांनी समाधानी नसलेल्या ४ इच्छूकांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केल्याने आजचा दिवस गाजतो आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील इच्छूक शेतकरी उमेदवार नाना पांडुरंग पाटील यांनी विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता जय मातादी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीचे थकबाकीदार तुम्ही आहेत म्हणून त्यांचा अर्ज नाकारण्यात आला आहे त्यांचे म्हणणे आहे की मी असे कोणतेही कर्ज घेतलेले नाही आणि माझ्याकडे याच पतसंस्थेने दिलेला निल दाखला आहे त्यामुळे मी या कक्षातच ठिय्या मांडलेला आहे नाना पाटील यांनी उमेदवारी दाखल करून एकनाथराव खडसे यांना आव्हान दिलेले आहे त्यामुळे त्यांना त्रास दिला जात असल्याची चर्चा येथे होती त्यांना एकच संस्था थकबाकीदार दाखवणे आणि निल दाखला देणे हे कसे करू शकते हा त्याचा वादात कळीचा मुद्दा आहे नाना पाटील यांनाही
उपविभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भाजपच्या भारती चौधरी यांनाही क वर्ग सोसायटीतून उमेदवारी दाखल केली म्हणून उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यांचे म्हणणे आहे की अन्य उमेदवार क वर्ग सोसायटीतून पात्र ठरलेले असताना आम्हीच कसे अपात्र ठरलो ?, या मुद्द्यावर त्यांनाही कक्षातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे भारती चौधरी यांनाही उपविभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याचा सल्ला देण्यात आला आहे भाजप उमेदवार म्हणून आम्हाला जाणूनबुजून हा त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यान्च्यासह त्यांच्या समर्थकांनी केला आहे
माजी आमदार स्मिता वाघ यांनाही अपात्र ठरवले म्हणून त्यांनी ठिय्या मांडला आहे माझा उमेदवारी अर्ज परिपूर्ण होता मात्र मुद्दाम माझ्या अर्जाच्या संचातून कागदपत्रे गहाळ करण्यात आली मी माझ्याकडे असलेली पीडीएफ फाईल समाबनाधित अधिकाऱ्यांना दाखवूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही भाजप उमेदवार म्हणून आम्हाला जाणूनबुजून हा त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत माजी आमदार स्मिता वाघ यांनीही ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
या तिघांसोबत माधुरी अत्तरदे यांनीही ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.