रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुमारे तेरा कोटीच्या निकृष्ट जलयुक्त शिवार कामांचा आगामी हिवाळी अधिवेशनात चौकशीचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
रावेर तालुक्यातील १९ गावांमध्ये सुमारे तेरा कोटी रुपये खर्च करून शासनाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी खर्च केल होते. त्यावेळच्या तात्कालीन अधिकारी व ठेकेदारांनी या पैस्यांची प्रचंड उधळपट्टी केली होती. या जलयुक्त शिवारचे बरेच कामे तालुक्यातील आदिवासी भागात झाले होते. परंतु, तेरा कोटी भष्ट्राचार व निकृष्ट कामांमुळे या भागात पाण्याची पातळी वाढली नाही. यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहेत.
रावेर तालुक्यात तेरा कोटी रुपये खर्च करून झालेल्या निकृष्ट कामांची आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशीसाठी राज्यसरकारने समिती गठीत केली आहे. तरी सुध्दा रावेर तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करण्या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे आ शिरीष चौधरी यांनी सांगितले.







