• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एन्सेफलायटीसने त्रस्त बालकाला मृत्युच्या दारातून

खेचून आणण्यात निष्णात बालरोग तज्ञ टिमला यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – बेशुद्धवस्थेतील सहा वर्षीय बालकाला घेऊन नातेवाईकांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालय गाठले, रुग्णालयातील बालरोग तज्ञांनी देखील केस पाहताच त्यांना अंदाज आला, तातडीने तपासण्या करुन उपचार सुरु झाले. बालकाला एन्सेफलायटीस (मेंदूज्वर) हा विकार जडला होता यात एक एक अवयव निकामी होतात मात्र रुग्णालयातील निष्णात बालरोग तज्ञांच्या अथक प्रयत्नांनी बालकाला मृत्युच्यादाढेतून ओढून आणले. आज बालक सुखरुप आहे.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर यांनी सांगितले की, अशी केस आम्हा सर्वांच्या पाहणीतील पहिलीच केस आहे. बालकाला आणले तेव्हा तो बेशुद्ध होता, त्याला झटके येत होते, तापही होता तसेच इंट्राक्रेनियल हायपरटेंशन अर्थात मेंदूवरही सूज होती परिणामी बालक हाता-पायांची अवास्तव हालचाल आणि अवास्तव बडबड करत होता. दरम्यान बालकाचे ऑक्सीजन सॅच्युरेशनही कमी होते तसेच लघवी अंत्यत कमी होती. अर्थात बालकाचे सर्व अवयव निकामीहोण्याच्या मार्गावर होते. पण बालरोग विभागाचे प्रमुख प्रो.डॉ.अनंत बेंडाळे, मी स्वत: (डॉ.उमाकांत अणेकर), निओनेटोलॉजीस्ट डॉ.सुयोग तन्नीरवार, डॉ.विक्रांत देशमुख, डॉ.गौरव पाटेकर, निवासी डॉ.सुरुची शुक्ला, डॉ.चंदाराणी या टिमने जिद्दीने प्रयत्न करुन आवश्यक अॅण्टीबायोटिक्स, आयव्ही फ्ल्यूईड्स दिले तसेच वारंवार किडनी फंक्शन टेस्ट करुन सलाईन बोलसही दिले व इंजेक्शन लॅसिक्सही दिले असे करुन लघवीला नॉर्मल केले. त्याचवेळी ऑक्सीजन सॅच्यूरेशन वाढविण्यासाठी ऑक्सीजन सपोर्ट व उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी हायपरटेंसिव व झटक्यांकरीता अॅण्टी इपेलेप्टिक ड्रग दिले. या सर्व ट्रिटमेंटचा हळूहळू परिणाम बालकावर दिसून येत होता, बालक उठून बसायला लागला, जेवण करु लागला.
तसचे एमआरआय केला असता बालकाच्या मेंदूवर सुज असल्याचे निर्दशनास आले, त्यावरही औषधोपचार केले. या संपूर्ण उपचारादरम्यान एका औषधीचा दुसर्या औषधीवर विपरित परिणाम होणार नाही याचाही सारासार विचार करुन आम्ही डॉक्टरांनी उपचार केले. या आजाराला एन्सेफलायटीस असे म्हणतात. ही केस आमच्या पाहण्यातही पहिल्यांदाच आल्यामुळे शिक्षक सुद्धा आयुष्यभर विद्यार्थीच असतो असेही डॉ.अणेकर यांनी सांगितले.
डॉक्टर साहेब तुमच्यामुळे मया पोरगा वाचला!
मी अशिक्षीत बाई, आम्ही शेतात मजुरी करतो तेव्हा घर चालते, एक मुलगी आणि एक मुलगा आहे, याआधी बर्याचदा मुले वारली. आता ह्या मुलाची तब्येत खराब झाली, मी घाबरली, हा वाचला नसता तर मी पण मरुन गेली असती. सावदा, भुसावळ येथील डॉक्टरांनी आमच्याकडे उपचार होणार नाही असे सांगितले. त्यामुळे येथे घेऊन आलो, इथल्या डॉक्टरांनी आम्ही प्रयत्न करतो असे सांगितले आणि खरोखरच आज माझा पोरगा इथल्या डॉक्टरांमुळेच वाचला, डॉक्टर साहेब लय आभारी आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार झाले.
– साधना धनगर, रुग्णाची आई


 

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/4-april-23-n-9/
Previous Post

मनपात नाट्यमय खेळी; भाजप, एमएमएमच्या माघारीने शिंदे गट, भाजपचे विजय झाले सोपे

Next Post

चोरट्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव ; शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

चोरट्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव ; शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon