विजेत्यांना आठ लाखांसह जैन इरिगेशन प्रायोजीत उत्तेजनार्थ परितोषिके प्रदान
जळगाव (प्रतिनिधी) – जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अकराव्या फेरीपर्यंत खेळाडूंमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. अखेरीच्या फेरीनंतर स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने तामिळनाडूच्या पूजा श्री हिचा पराभव करत विजेतेपद मिळवले. मुलांच्या गटात दिल्लीचा आरित कपिल याने विजेतेपदावर आपले नाव कोरले. आरितची पश्चिम बंगालच्या नरेंद्र अग्रवालसोबत शेवटच्या फेरीची लढत झाली. त्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला. परंतु आरितने सर्वाधिक ९.५ गुण घेत राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
विजेत्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अजितकुमार वर्मा, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लि. अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, तजाकिस्तानचे ग्रँडमास्टर फारुक अमातोव, मुख्य ऑरबिटर देवाशीष बारुआ यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारूक शेख, राजेंद्र कोंडे, अंकूश रक्ताडे, अहिल्यानगरचे यशवंत बापट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने ९ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकवला. तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. दुसरा क्रमांक केरळमधील दिवी बिजेश (९ गुण) हिने मिळवला. तिला ६० हजारांचा पुरस्कार देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूतील पूजा श्री राहिली. तिनेही ९ गुण घेत ५० हजारांचे पारितोषिक मिळवले. त्रिपुरामधील आराध्य दास चौथी (८.५ गुण) तर झारखंडमधील दिक्षिता डे (८.५ गुण) ही पाचव्या क्रमांकावर राहिली. त्यांना अनुक्रमे ४० हजार आणि २५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. सहाव्या क्रमांकाचा १५ हजारांचा पुरस्कार वंशिका रावल (दिल्ली) हिला मिळाला. त्यानंतर सातव्या पासून विसाव्या क्रमांकावर आलेल्या सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.
त्यात जानकी एस.डी. (केरळ), समहिता (तेलंगणा), प्रिशा घोलप (महाराष्ट्र), आराध्या उपाध्याय (राजस्थान), राजनया मंडल (पश्चिम बंगाल), ज्ञानेश्री आर (तामिळनाडू), भूमिका वाघले (महाराष्ट्र), दीपाश्री गणेश (तामिळनाडू), नश्रता (कर्नाटक), राशी वरुडकर (छत्तीसगड), नारायणन रिश्रीथा (आंध्रप्रदेश), अश्रया नरहरी (तेलंगणा), आसावी अग्रवाल ( महाराष्ट्र), दक्षिणा आर (केरळ) यांचा समावेश आहे. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या लढतीत दिल्लीत आरित कपिल याने ९.५ गुण घेत ७० हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मिळवले. दुसरा क्रमांक पश्चिम बंगालमधील वोशिक मंडल याने मिळवला. त्याने ९ गुण घेत ६० हजार रुपयांचा पुरस्कार जिंकला. तिसरा क्रमांक महाराष्ट्रातील अद्वित अग्रवाल याने ८.५ गुण घेत मिळवला. त्याला ५० हजारांचा पुरस्कार मिळाला.
पश्चिम बंगलामधील नरेंद्र अग्रवाल आणि मनी सरबोथो यांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला. त्यांना ४० आणि २५ हजाराचा पुरस्कार मिळाला. हरियाणामधील व्योम मल्होत्रा याने १५ हजारांचा सहावा पुरस्कार मिळवला. सातव्यापासून विसाव्यापर्यंतच्या खेळाडूंना दहा हजारांचा पुरस्कार देण्यात आला. त्यात आर्यन (कर्नाटक), अशोक समाकस (कर्नाटक), अरिहित चौहान (महाराष्ट्र), आर्यन मेहता (महाराष्ट्र), राहुल रामकृष्णन (पाँडिचेरी), अभिनव आनंद (कर्नाटक), इशान कंडी (तेलंगणा), श्रीराम बाला (तामिळनाडू), व्यंकट नागा (कर्नाटक), सर्वेस ई (तामिळनाडू), रेयान्स व्यंकट (महाराष्ट्र), अद्विक रेड्डी (तेलंगणा), निधेश शामल (तेलंगणा), अक्षय विग्नेश (तामिळनाडू) यांचा समावेश आहे.
जैन हिल्स येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातील ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाले होते. शुक्रवारी या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीचे उद्घाटन माजी आमदार मधू जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी रवींद्र नाईक, राजेंद्र कोंडे, नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. मुलांच्या अकराव्या फेरीतील लढतीत पश्चिम बंगालमधील नरेंद्र अग्रवाल आणि दिल्लीतील आरित कपिल यांची लढत बरोबरीत सुटली. महाराष्ट्रातील अद्वित अग्रवाल आणि हरियाणातील व्योम मल्होत्रा यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेरी दोन्ही खेळाडूंनी सामना बरोबरीत सोडण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या गटात तामिळनाडूच्या पूजा श्रीने सुरुवातीपासून आक्रमक चाली रचत टॉप मानांकीत खेळाडू महाराष्ट्राच्या क्रिशा जैन हिचा पराभव केला. परंतु क्रिशा जैन हिचे गुण जास्त असल्यामुळे तिला विजेतेपद मिळले. मुलींच्या दुसऱ्या लढतीत केरळमधील दिवी बिजेश हिने महाराष्ट्रातील भूमिकाचा पराभव केला.
पुरस्कार समारंभाच्या स्थळी गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे इको फ्रेंडली राखीचे स्टॉल मांडण्यात आला होता. त्याला सर्वांची पसंती मिळाली. देश विदेशात स्पर्धेसाठी जात असतो येथील स्पर्धेचे सर्वच नियोजन उत्कृष्ट होते. मुलं व पालकांना जैन हिल्स चा निसर्गरम्य परिसर खूप भावला. बुद्धिबळ हा फक्त खेळ छंद जोपासू नये ते चांगलं मनुष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. असे अजितकुमार वर्मा म्हणाले. फारुक अमानातो यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, खेळात विजय-पराभव सुरुच असतो. परंतु पालकांनी मुलांवर अतिरिक्त तणाव देऊ नये. उद्याचे ते ग्रँडमास्टर आहेत, असे मनोगत व्यक्त केले. पालकांच्या वतीने दुबई येथील प्रज्ञा खराटे, हरियाणा येथील श्रीमती विद्या यांनी मनोगत व्यक्त केले. नोव्हेंबर महिन्यात अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या परिपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नंदलाल गादिया यांनी सूत्रसंचालन केले. प्रविण ठाकरे यांनी आभार मानले. मुख्य पंच देवाशीष बरुआ यांनी संपूर्ण स्पर्धेचा अहवाल सादर करुन निकाल घोषित केला. त्यावेळी अतुल जैन यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या माध्यमातून खेळाडूंच्या मूल्यांकनानुसार विजयी, पराजीत व बरोबरीत असलेल्या सर्व बुद्धिबळपटूंना रोख पारितोषीके दिले हा उपक्रम देशभरातून पहिल्यांदाच जळगाव या क्षेत्रात बघायला मिळाला. त्यातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल असेही ते म्हणाले. त्यानंतर निकालाचे वाचन मंगेश गंभीरे यांनी केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.