मुंबई (वृत्तसंस्था) – परिस्थिती जेव्हा परिक्षा घेते, तेव्हा जिद्द जन्म घेते. अशीच साधारण मुलीची असाधारण यश सध्या सर्वांनाच भावले आहे. फुटपाथवर राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने महाराष्ट्र बोर्डामध्ये ४० टक्के गुण मिळवले आहेत. अस्मा शेख असे त्या मुलीचे नाव आहे.
याबद्दल बोलताना अस्मा शेख म्हणाली कि, केवळ वाचता यावे म्हणून अनेक रात्री विजेच्या दिव्याखाली बसत होते. कारण यावेळी गर्दी देखील कमी असते. पावसाळ्यात अशाप्रकारे अभ्यास करणे कठीण होते. तेव्हा वडील प्लॅस्टिक कव्हर घेऊन येत असे आणि त्याच्या आधाराने अभ्यास करत असल्याचेही तिने म्हटले आहे. अस्माला कला शाखेत शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
अस्माचे वडील सलीम शेख हे मुंबईच्या रस्त्यावर वस्तू विकतात. लिंबू पाणी, भुट्टा सारख्या वस्तू विकून ते आपले पोट भरतात. मुलीने कठीण काळातही अभ्यास करून दहावीमध्ये घवघवीत यशमिळवल्याने आनंद असल्याचे म्हंटले आहे. सलीम शेख म्हणाले कि, मी वडीलांसोबत मुंबईमध्ये आलो. केवळ पहिलीपर्यंत शिकलो. पण माझ्या मुलीने शिकून तिचे स्थिर आयुष्य मिळावे, अशी त्यांनी व्यक्त केली आहे.
करोना व्हायरसमुळे अस्मा मागील सहा महिन्यांची फी भरू शकली नव्हती. यावेळी काही स्थानिक राजकीय गट आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीला आले आणि त्यांनी अस्माच्या शाळा फी भरण्यास मदत केली.
दरम्यान, अस्माची कहाणी मागील काही तासांत सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील दखल घेत युवासेनेकडून तिला शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या आहे. युवासेना सदस्य राहुल कनंल यांनी अस्माच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.







