यावल (प्रतिनिधी) – दि. १ ऑगस्ट २०२० शनिवार रोजी साजरा होणाऱ्या बकरी ईद सणानिमित्त यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक दि. ३१ जुलै शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता यावल पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली.
या बैठकीत शनिवार रोजी बकरी ईद सण असल्याने रमजान प्रमाणेच ईदगाह व मस्जिद मध्ये कोणीही नमाज पठण करू नये व बकरी ईद शांततेत पार पाडावी असे आवाहन यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले या बैठकीत उपस्थित मौलाना यांच्याकडून यावल पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.