नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मेक्सिको, आकाशात विविध गोष्टी घडत असतात. मात्र खगोल प्रेमींसाठी एक अद्भुत व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उल्का वर्षाव होताना दिसत आहे. हा व्हिडीओ संगीतकार अंबर कॉफमॅनने आपल्या कॅमऱ्याच टिपला आहे. हा व्हिडीओ न्यू मेक्सिकोच्या ताओस येथे शूट करण्यात आला आहे. क्वचितच असे क्षण कॅमेऱ्यात टिपले जातात. त्यामुळे हा अद्भुत व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ अपलोड करातान कॉफमॅननं, मित्रांनो, मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीही न पाहिलेली एक गोष्ट आज पाहिली. आणि मी याचा व्हिडीओही काढला आहे, असे कॅप्शन लिहिले आहे.