खामगाव ( वृत्तसंस्था ) – खामगाव येथील एका पेट्रोल पंपाच्या पार्कींगमध्ये उभा असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने भिती पसरली होती. सुदैवाने कोणतीही जीवन हानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे विजय लक्ष्मी पेट्रोल पंपच्या पार्किंगमध्ये ट्रक उभा होता. रविवारी रात्री अचानकपणे उभा ट्रकने पेट घेतल्याने भिती पसरली होती. हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठी खळबळ उडाली होती. यात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पण एकंदरीत आपल्या वाहनांची वेळोवेळी दुरुस्ती व निगराणी करणे आवश्यक आहे .नाहीतर वायरिंग मधल्या शॉर्टसर्किटमुळे जीवितासोबत वाहनाचे देखील नुकसान होवु शकते.