• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कृषिउद्योजकांसह तरुण शेतकऱ्यांसाठी फालीच्या संमेलनाचे जळगावात आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
फॅशन शो मध्ये आदिती गुरचल प्रथम

महाराष्ट्र, गुजरातमधील ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) – शेतकरी आणि कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणत आहे. जैन हिल्स येथे फालीचे आठवे संम्मेलन आयोजित करण्यात आलेले आहे. हे संम्मेलन १ व २ तसेच ४ व ५ जूनरोजी दोन भागात घेतले जाईल. या संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजराततेतील १३५ शाळांमधील ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.आधुनिक शेती, कृषी व्यवसाय तसेच ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत व उच्च शिक्षण घेणाऱ्या सहा फालीच्या माजी विद्यार्थ्यांची यासाठी खास उपस्थित असेल. फाली शाळांमधील संवादात्मक शिक्षण, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, वेबिनार, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा या सर्वांसाठी नेमलेले ७० हून अधिक ए. ई. (अॅग्रिकल्चर एज्युकेटर) बी.एस्सी आणि एम.एस्सी झालेले आहेत. त्यांचीही उपस्थिती असेल.

फाली व ज्या कंपन्या पुरस्कृत करतील अशा कंपन्या आणि बँकांचे ज्येष्ठ व्यवस्थापक आणि ३० हून अधिक प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहतील. सध्या जैन इरिगेशन, गोदरेज अॅग्रोव्हेट, यूपीएल, स्टार अॅग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात.

जैन इरिगेशन फालीच्या या आठव्या संम्मेलनाचे यजमान आहेत. भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे.

फालीचा गेल्या आठ वर्षातील संवादात्मक शिक्षण, क्षेत्रभेटी, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा, आधुनिक शेती आणि व्यावसायिक ज्ञान हा प्रभावशील कार्यक्रम संस्थापित झालेला आहे. तो नवीन पिढीला शेतीक्षेत्राकडे आकर्षित करतो . फालीची अनुभवी टीम, ए.ई. हे इ. ८ वी, ९ वीच्या विद्यार्थ्यांना परस्पर संवाद आणि प्रात्यक्षिके या द्वारे आधुनिक आणि शाश्वत शेती, कृषिउद्योग यांचे शिक्षण देतात.

अधिक माहिती युट्युबवर https://youtu.be/4IbrCqYfOHw या लिंकवर पाहता येईल.

फालीमुळे शेतीकडे उत्तम करियर म्हणून बघितले जात आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या विचारसरणीमध्ये सकारात्मक बदल फाली घडवित आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीपद्धती त्यांच्या कौटुंबिक शेतीत वापरायला सुरवात केलेली आहे. पालकांना आधुनिकतेसह शाश्वत शेती आणि त्यातून कृषिव्यवसायाचा समृद्ध मार्ग सापडला आहे फालीचे हेच मूल्यांकन आहे.

२० मेरोजी कंपनी कायद्यातल्या ८ व्या कलमानुसार जानेवारी २०२१ मध्ये स्थापित असोसिएशन फॉर फालीच्या संचालक मंडळाने फाली उपक्रम विस्ताराच्या नियोजनाला मंजुरी दिली आहे. फालीच्या संचालक मंडळात नादीर गोदरेज (अध्यक्ष फाली व गोदरेज ग्रुप), रजनिकांत श्रॉफ ( अध्यक्ष यूपीएल) , अनिल जैन ( उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन ) , नॅन्सी बेरी ( उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली ) कार्यरत आहेत . फाली उपक्रमाचा विस्तार २५ टक्के प्रती वर्ष या वेगाने केला जाईल. पुढील सहा वर्षात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात सध्याच्या कंपन्यांच्या, बँकांच्या आणि फाऊंडेशनच्या निधीच्या पाठिंब्याने विस्ताराला फालीच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली आहे. फाली उपक्रम २०३१ पर्यंत आठवी आणि नववीच्या एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल.
भारताच्या शेतीतील प्रगतीशील नायक म्हणून अडीच लाख फाली नायक तयार होतील. जे विद्यार्थी कृषी किंवा शास्त्र विषयातील उच्च शिक्षण घेत असतील, कृषी व कृषीपुरक क्षेत्रात कार्यरत आहेत अशा माजी फाली विदयार्थ्यांना इंटरशिप म्हणून, शिष्यवृत्ती आणि कृषि व्यवसायासाठी प्रारंभीक निधी पुरविण्याच्या कार्यक्रमाला संचालकांनी मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम इ. ८ वी व ९ वीतील विद्यार्थ्यासोबत फाली अभ्यासाला बळकटीकरण देईल आणि फाली आयुष्यभर विद्यार्थ्यांसोबत राहील.

फाली उपक्रमाला विदयार्थी आणि त्यांच्या पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फाली विदयार्थ्यांनी त्यांच्या कुटंबातील शेतीत सुधारणा केली आहे. जास्त उत्पन्न मिळणारी नगदी पिके लागवड, उत्तम जातींच्या पशुंचे पालन आणि माती परीक्षण व दूध परीक्षण यासारख्या आधुनिक पद्धती स्वीकारल्या आहेत. फाली उपक्रमाच्या मूल्यांकनामध्ये दिसून आल्याप्रमाणे ९० टक्के विदयार्थ्यी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेती आणि कृषी व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी सुसज्ज आहेत. ९० टक्के फाली विदयार्थी उच्च शिक्षण घेणार आहेत. ४५ टक्के माजी फाली विदयार्थी सध्या शिक्षणासोबत शेती क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जवळजवळ ८०० फाली माजी विद्यार्थ्यांनी कृषी व्यवसाय सुरू केले आहेत.

फाली संमेलनामध्ये विद्यार्थी फळबागेच्या लागवड पद्धती, शिवारफेरी, टिश्यूकल्चर, सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, आर अॅण्ड डी, सिंचन प्रकल्प, गांधीतिर्थ यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतील. प्रगतीशील शेतकऱ्यांबरोबर जैन हिल्सवर संंवाद साधतील. फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स सादर करतील. विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल.

यावेळी फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. २ जूनला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, यूपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ अध्यक्षीय भाषण करतील. जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन मनोगत व्यक्त करतील. ५ जूनला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे बुर्जीस गोदरेज यांचे मुख्य भाषण होईल.

फाली संम्मेलनाच्या अधिक माहितीसाठी, सुप्रित सुधाकरन ( मोबाईलः 9920584295; Supreeth.sudhakaran@godrejinds.com ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH
Previous Post

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर, मनिषा हटकर यांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

Next Post

जून महिन्यात जिल्ह्यात ‘ ऑपरेशन मुस्कान ११ ‘ शोध मोहीम पोलीस राबवणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जून महिन्यात जिल्ह्यात ' ऑपरेशन मुस्कान ११ ' शोध मोहीम पोलीस राबवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon