जामनेर ( प्रतिनिधी ) – पहूर येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास पेठ ग्रामपंचायत इमारतीखाली अंडापाव गाडीवर सतिष कडूबा पांढरे व राहूल नाना भोंडे या युवकांवर चाकूने वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्राणघातक हल्ल्यामुळे पहूर येथे भीतीचे वातावरण आहे.
हल्ला करणारे संशयित रोहित थोरात, शुभंम पाटील. व बंडू पाटील असल्याचे पोलिसांनी सांगितले हल्लेखोर आरोपीं घटनास्थळावरून पळून गेले होते
पो नि प्रताप इंगळे, पोउनि अमोल गर्जे, पोउनि संदीप शेटे, पो कॉ गोपाल माळी, भरत लिंगायत, ईश्वर देशमुख, विनय सानप, रवींद्र देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे यांनी रात्रभर परिसर पिंजून काढत आरोपीना हिवरखेडा शिवारातून अटक केली. शुभम पाटील, बंडू पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली रोहित थोरात फरार आहे.
अटक केलेले शुभम पाटील व बंडू पाटील या आरोपींची घटनास्थळापासून पहूर बसस्थानक मार्गे थेट पहूर पोलीस स्टेशनपर्यंत हातात बेड्या घालून धिंड काढण्यात आली. व्यापाऱ्यांना चाकू दाखवणे, चाकू व तलवार घेऊन फिरणे यांमुळे गावात भीतीचे वातावरण आहे .त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना हद्दपार करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
सतीश पांढरे व राहुल भोंडे या जखमींना उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले असून पहूर पोलीस स्टेशनला विलास पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित थोरात , शुभम पाटील , बंडू पाटील या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल गर्जे करीत आहेत . बसस्थानक परीसरात काही वेळ तणाव पूर्ण वातावरण होते.