पारोळा ( प्रतिनिधी ) – पळासखेडे सिम येथे वीज कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलीसात उमेश पाटील ( तंत्रज्ञ म.रा.वि.वि कंपनी ) यांनी फिर्याद दिली की, 30 मे रोजी दुपारी मोरफळ गावी विजेचे काम करीत असताना पळासखेडे सिम येथून कोमल पाटील यांनी फोन करून सांगितले की मेन लाईनच्या पोलमध्ये करंट उतरले आहे. यासाठी मी मोरफळ येथून पळासखेडे गावी आलो असता पळासखेडे गावातील भिलाटी भागातील पोलवर करंट उतरले होते .तो फॉल्ट सापडत नसल्याने पळासखेडे गावातील विलास पाटील यांनी तारांवर टाकलेले आकडे दिसले, त्यामुळे वीज चोरी होत असल्याचे दिसून आले.म्हणून मी ती वायर बाहेर काढली असता त्यांना राग आल्याने विलास पाटील व मयुर पाटील यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व धमकी देऊन मारहाण केल्याबाबत पारोळा पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.